spot_img
spot_img

वाढदिवसानिमित्त दाजींना देणार प्यार की झप्पी…. दाजींची नफरत की दुकान बंद करणार……मनोज लाहुडकर

चिखली (हॅलो बुलडाणा) उद्या एक सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखलीच्या विद्यमान आमदार सौ श्वेता महाले यांचे पती श्री विद्याधर महाले यांचा वाढदिवस आहे. श्वेता ताई यांन्चे पती म्हणून विध्याधर महाले यांना पूर्ण मतदारसंघ “दाजी” म्हणून ओळखतो.त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचे सत्कार ठेवले आहेत,आपण ही त्यांना वाढदिवसानिमित्त “जादू की झप्पी” देऊन ते करत असलेल्या काही चुका हक्काने आपल्या ‘दाजींना’ दाखवून देणार आहोत,त्यांनीही आपल्या मेहुणे कम साल्याना शत्रू न समजता साल्यांच्या मोहब्बत की दुकान मधून काही खरेदी करावं असे लाहुडकर म्हणाले.

मनोज लाहुडकर हे उदयनगर येथील लोकनियुक्त सरपंच असून काही दिवसापूर्वी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला त्यांना बुलढाण्यासह पाच जिल्ह्यातून तडीपार का करण्यात येऊ नये? यासंबंधी नोटीस जारी करण्यात आली होती.सदर नोटीस गृहमंत्री यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले यांच्या दबावातून,आणि त्यांच्या विरोधी पक्षात कार्यरत असल्यामुळेच आपल्याला देण्यात आली आहे असे आरोप मनोज लाहुडकर यांनी केले होते.

मनोज लाहुडकर यांनी सौ श्वेता महाले व विद्याधर महाले यांचे नाव न घेता, ताई आणि दाजी यांनी दहशतीचे राजकारण सुरू केले आहे. कुनाचीहि सत्ता नेहमीसाठी राहत नाही,कुणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो,आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या राहणार नाही! दहशत पेराल तर दहशतच उगवेल त्यामुळे ताई आणि दाजी यांनी त्वरित “नफरत की दुकान बंद करून, मोहब्बत की दुकान” सुरू करावे,असा सल्ला कम टोमणाही लाहुडकर यांनी लगावला.

उपस्थित हजारो तरुणांना आपल्या साडे तीन मिनिटांच्या हिंदी कम मराठी भाषणात उद्देशून बोलतांना “दहशतीला प्रेमाने उत्तर” देण्याचे आवाहन करून “हजारो दिलो की धडकन” बनलेल्या या सरपंचाने साडे तीन मिनिटात उपस्थित हजारो तरुणांच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहतील अशी “गांधीगिरी” करून श्वेताताई महाले यांचे पाच दहा हजार मतदान कमी केले अशीच चर्चा संपूर्ण चिखलीत होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!