spot_img
spot_img

गाठभेट! ‘आले तूफान किती, जिद्द न सोडली..!’ -विजयराज शिंदेंच्या पायला भिंगरी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) थकवा नाही..पाय दुखण्याची पर्वा नाही.. दिवस असो वा रात्र..मेंदू सशक्त ठेवून आपली पावले पुढे टाकताना माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भेटीगाठीचा झंझावत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सध्या पहायला मिळत आहे.

‘आले तूफान किती, जिद्द न सोडली..झेप घेतली आकाशी स्वप्ने केली पूरी..!लढलो आणि जितलो मी काटंच्या वाट वरी, दुश्मनभी आजही वाकुन मला सलाम करी!’ हे गाणं उरात जिद्दीने साठवून विजयराज शिंदे गावागावात जाऊन भेटीगाठी घेताहेत. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, विविध समाजाच्या मान्यवर मंडळींकडून माहिती घेताहेत. त्याचबरोबर विविध समाजिक संघटनांना देखील ते मार्गदर्शन करत आहेत. दररोज त्यांच्या या कार्यक्रमांमध्ये वाढ होत आहे. विजयराज शिंदे यांनी आमदार म्हणून तीन वेळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणारे हे पहिले बुलढाणा विधानसभाचे आमदार ठरलेले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. जुना जाणता खेळाडू मैदानात जिद्दीने उतरल्याने मीच मैदान मारणार असा प्रगाढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!