spot_img
spot_img

अंगाई गात रहावे.. अजाण ‘पालीका’ झोपताहेत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अजाण बालक-बालिकांना अंगाई गीत गाऊन निद्रिस्त करण्यात येते.तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी अंगाई गात असल्याने बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील अजाण नगरपालिका सध्या स्वच्छते संदर्भात डुलक्या देताहेत.पावसाळ्यात रोगराईच्या प्रश्नाला बगल देणारा पालिकांचा कामचुकारपणा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण करीत असल्याचे घाणेरडे चित्र जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यात दिसून येत आहे.

‘स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना केवळ कागदावरच आहे. रस्ते तसेच नागरी ‎वस्तीतील परिसर,ठिकठिकाणच्या ‎मोकळ्या जागांनी गटाराचे रूप‎ धारण केले आहे.अनेक भागातील लहान मोठ्या नाल्या तुंबल्यात.कचराकुंडीत अनेक जण कचरा न टाकता बाजूला उघड्यावर कचरा टाकून अस्वच्छता
करताहेत. घंटागाड्या अनियमित येतात.
तेरा ही तालुक्यात कोठे ही गेले तरी पावसामुळे दमट हवामानाने माशा काही पाठ सोडत नाहीत.त्यात अनेक प्रभागातील गटारी तुंबल्याने कचऱ्याचे ढीग साठल्याने डास मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे संसर्गजन्य आजार वाढण्याचा धोका नागरिकांतून व्यक्त होतोय.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संबंधीत ठेकेदाराच्या‎ मनमानी कारभार व निष्काळजी‎ पणामुळे आणि ठेकेदार सफाई‎ कामगारांचे नियमित वेतन देत‎ नसल्यामुळे नियमीत स्वच्छता होणे‎ थांबले आहे. त्यामुळे शहरात‎ जागोजागी ढिगारे व नाल्या सुध्दा‎ तुडुंब भरल्या आहे.
वर्षभर नाही तर किमान नगर पालिकेने पावसाळ्यात तरी कीटकनाशकांची फवारणी करणेअत्यावश्यक ठरते.याकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी सुद्धा डोळेझाक करीत असल्याचा आरोप होतोय.परिणामी सुरळीत स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जनतेमधून होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!