मेहकर (हॅलो बुलढाणा /सतीश मवाळ) पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे.शहरातील सोडा ग्रामीण भागात आजही रस्त्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्याचा तर जीवघेणा खेळ चालला असून, ‘खड्डेच खड्डे चहुकडे..हरविला रस्ता कुणीकडे?अशी बकाल अवस्था दिसून येते.
मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारखेड ते कळंबेश्वर रस्त्याकडे यंत्रणेचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष आहे.हा दुर्लक्षित रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे.त्यामध्ये
परिसरातील पाईप लाईन धारकांनी खोदकाम करून आणखी भर टाकली. पावसामुळे या रस्त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. कासारखेड ते कळंबेश्वर 3 किलोमीटर अंतर असून आबाल वृद्धांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परिसरातील थार खुदनापुर इ. गावांतील नागरिक या रस्त्यावरून मार्गक्रमण करतात परंतु त्यांचा जीव आता धोक्यात आला आहे.येथे अनेक अपघाताच्या घटनाही घडल्या.दरम्यान लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष वेधून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










