spot_img
spot_img

ना. गुलाबराव आता निवडणूक जवळ आली हो! -चौकशी होणार? समिती नेमणार? स्वच्छ पाणीपुरवठा होणार?

मेहकर (हॅलो बुलढाणा /सुभाष नरवाडे) मेहकर व लोणार तालुक्यातील
जलजीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी अल्पावधीतच करण्यात येणार असून यासाठी एक तज्ञ समिती नियुक्त करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

मुंबई येथे 20 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि मेहकर लोणार तालुक्यातील योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी हे आदेश त्यांनी दिले. आमदार रायमुलकर यांनी यासंदर्भात बैठक घेण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षात मुंबई येथे ही बैठक घेण्या मागणी केली होती त्या अनुषंगाने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षात मुंबई येथे ही बैठक झाली त्यात बैठकीत आमदार डॉक्टर संजय रायमुलकर प्रधान सचिव संजय खंदारे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा अभियंता अजय सिंग मुख्य अभियंता प्रशांत भामरे उपस्थित होते . योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी करणाऱ्या संबंधित कंपनीनेही कामाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे या कंपनीला काळे यादीत टाकण्यासोबतच मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्वच पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले .परंतु नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत की,यापूर्वी हे काम का झाले नाही? निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम साशंकता व्यक्त करत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!