spot_img
spot_img

इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलढाणा’ चा धसका! – 165 दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी होणार! – पण दुर्दैव!ज्यांनी बोगस सर्टिफिकेट दिले तेच करणार पडताळणी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण महाराष्ट्र भर गाजविण्यात ‘हॅलो बुलढाणा’ व ‘दैनिक जनसंचलन’ चा मोठा वाटा आहे.जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची पोलखोल केल्यानंतर 165 दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी आदेश देण्यात आले आहे.परंतु दुबळी यंत्रणा यातून काही सत्य बाहेर काढेल असे वाटत नाही.कारण ज्यांनी बोगस प्रमाणपत्र (पैसे घेऊन?) संबंधितांना दिले त्यांच्याचकडेच ही पडताळणी आली आहे.पर्यायाने त्यांचे पुन्हा खिसे भरणार आहेत.

कलेक्टरही गुळाचे गणपती बनले.त्यांचं नेतृत्व कोणी स्वीकारताना दिसत नाही.ते केवळ गुणगौरव सत्कार सोहळ्यात बिझी असतात.नागरिकांच्या समस्या सोडविण्यात त्यांना सपशेल यश आले असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रचंड भ्रष्टाचार वाढला.कोट्याधींच्या भ्रष्टाचारानंतरही अजून रुग्णालय सुधारलेले नाही.आता दिव्यांग बोगस प्रमाणपत्राचा किस्सा बाहेर आला आहे.
राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदांच्या विविध योजनांचा फायदा लाटण्यासाठी बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याचे पेव फुटले होते.फायदे लाटण्यासाठी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडून शिक्षण विभागासह अनेक विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी हे पाप केल्याचे जाणकार सांगत आहेत.शिक्षण विभागात शासनाची फसवेगिरी करणाऱ्या बोगस शिक्षकांच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांचे शारीरिक दिव्यंगत्व तपासण्याची गरज आहे. ही तपासणी झाल्यास बहुसंख्य शिक्षकांचे पितळ उघडे पडणार असल्याची प्रतिक्रिया हाती आली आहे.दरम्यान या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करतच आहोत आणि करणार आहे.परंतु प्रश्न हा आहे की, लोकप्रतिनिधी आणि कलेक्टर काय करतात?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!