spot_img
spot_img

सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा!

डोणगाव (हॅलो बुलढाणा / अनिल राठोड) स्वर्गीय इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपाताई रमेश सावजी होत्या.
प्रमुख अतिथी दिलीप काका कळसकर व जीवनसिंग दिनोरे सर होते तसेच स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी हितेश भाऊ सदावर्ते, पूर्वाताई सदावर्ते विजुभाऊ काळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक गाढे सर उपमुख्याध्यापक नखोद सर, बुलढाणा अर्बन बँक डोणगाव शाखेचे व्यवस्थापक वाहेकर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्काऊट गाईड पथकाने राष्ट्रध्वज तसेच स्काऊट ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केले. दिनोरे सर तसेच गिऱ्हे मॅडम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरवाडे सर यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तायडे मॅडम, लाड मॅडम निलेश राठोड,सर बाजड सर, टेकाळे सर यांनी सहकार्य केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!