बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पर्यावरणाचा प्रश्न ही आज एक जागतिक समस्या झाली आहे. सध्या प्रदूषण इतके वाढले आहे की प्रदूषणाचे आपण केव्हा बळी होऊ हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून भारत सरकार तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असतात.परंतु यात शाळा देखील मागे नाहीत.आज प्रबोधन विद्यालयाच्या वृक्षदिंडीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा जागर केलाय.
स्थानिक प्रबोधन विद्यालयाच्या हरित सेनेच्या वतीने पर्यावरण जन जागृती साठी वृक्ष दिंडीचे आज आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्यद्वारे वृक्षतोड थांबविण्याचे व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन केले. एकता नगर येथील गजानन मंदिर येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्ग 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी दरम्यान स्थानिक नागरिकांना वृक्ष भेट देऊन त्याचे सं वर्धन करण्याचा आग्रह केला . एकता नगर मधील गजानन मंदिर व हनुमान मंदिर च्या परिसरात झाडे लावण्यात आली.याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संदीप जाधव, शिवशंकर बोरबळे , नयना राठोड, कोल्हे , जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.













Total Users : 3295412