spot_img
spot_img

त्या स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या नरकयातना शमल्या! -ग्रामपंचायतने नव्हे तर 2 कर्मचाऱ्यांनी टाकला मुरूम!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सबका विकास केल्याच्या बतावण्या लोकप्रतिनीधी अन् प्रशासन करीत असले तरी खेड्यागावांचे प्रश्न मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे पिंपरी आंधळे गावातील जाणारा स्मशानभूमीपर्यंचा मुख्य रस्ता नरकयातना भोगतोय. ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्याचा चिखल अबाल वृद्धांच्या जीवावर उठत असताना, 2 कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

गावातील स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. याच रस्त्यावरून ग्रामस्थ इजा करतात.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना याच रस्त्याहून शाळेत जावे आणि यावे लागते.या जीवघेण्या चिखलमय रस्त्याकडे अनेकदा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे लक्ष वेधले.परंतु ग्रामपंचायतने रस्त्याच्या समस्ये कडे कानाडोळा केला.दरम्यान गावातील 2 कर्मचाऱ्यांनी या रस्त्यावर स्वखर्चाने मुरुम टाकण्याचे काम हाती घेतले.15 ऑगस्ट ला याच रस्त्यावरून शाळांची प्रभात फेरी निघणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना हा मार्ग आता सुकर होणार आहे.हा रस्ता तात्पुरता का होईना मुरूम टाकून दुरुस्त होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दर्जेदार रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडे याप्रकरणी ग्रामस्थ पाठपुरावा करणार असल्याचे सांगत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!