बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहरात नोंदणीकृत 471 हातगाडीवर अन्नपदार्थ विकले जातात, आणि त्यांच्याकडे परवाना सुद्धा आहे. परंतु बुलढाणासह जिल्ह्यात शेकडो लोक अनधिकृतपणे उघड्यावर अन्नपदार्थ विकत आहेत. त्यांचे परवाने सुद्धा नाही. परिणामी पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे अन्न औषधी प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. केवळ हे प्रशासन वसुली करीत आहे का?असा प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाचे म्हणजे हे खाद्यपदार्थ सेवन केल्याने विषबाधा सुद्धा होऊ शकते.. कारण रात्रीचे उरलेले अन्न अन्नपदार्थ हॉटेलमधून सकाळी विकल्या जातात. त्यांना अन्नपदार्थांवर दिनांक व वेळेच्या पाट्या लावण्याचा आदेश देण्यात आलेला होता. परंतु अन्न औषध प्रशासन विभाग झोपेत आहे की वसुलीत गुंग आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अन्नसुरक्षा कायदा 2006 च्या कलम 31 नुसार खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना परवाना घेणे अनिवार्य आहे. परवाना न घेतला तर विक्री करणाऱ्याला तीन महिने करावास आणि पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.. अशी तरतूद असल्याने, विक्रेते घाबरून जातात.. परिणामी अन्न औषधी प्रशासन पैसे वसुली करण्यात व्यस्त असतात, असा समज झालाय. दरम्यान कुणीतरी टोकाची भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.
आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आरोग्य मंत्री असताना त्यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. सगळ्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना हॅन्ड ग्लोज घालण्याचे व स्वच्छता राखण्याचा आवाहन केले होते. परंतु ते दहा दिवसही टिकले नाही. आता आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.










