9.1 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

अमर राऊत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम विदर्भ विस्तारक पदी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आरोग्यविषयक व सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले पत्रकार अमर राऊत यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम विदर्भ विस्तारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या निर्देशानुसार त्यांना या नियुक्तीचे पत्र मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत व सह कक्षप्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम विदर्भ विस्तारक म्हणून अमर राऊत यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमर राऊत यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.डॉ.श्रीकांत शिंदे, केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे यांना दिले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!