बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यभरातील शेतकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी व युवा कार्यकर्ते आज २४ जुलै रोजी पुण्यात पोहोचलेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथे महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक संपन्न होत आहे.या बैठकीत चळवळीची पुढील दिशा व राजकीय भूमिका यावर विचारमंथन सुरू आहे. दरम्यान बैठकीच्या सुरुवातीलाच ‘रविकांत तूपकर आगे बढो हम तुम्हारे साथ है!’या घोषणेने पुण्यनगरी दुमदुमली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकरांना बडतर्फ केल्यानंतर ते आज पुण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. थोड्याच वेळात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.