बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील वाहतूक नियमनास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एखाद्या भागात कोंडी झाल्यास तेथील कोंडी त्वरित सोडवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असताना कारंजा चौकात वाहनांची का कोंडी होते? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कारंजा चौकात नेहमीच येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामध्ये वाहनांची ही ये-जा सुरू असते. परंतु वाहतुकीची कोंडी झाल्याने येथे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. येथे वाहतूक पोलीस केवळ घंटा दोन घंटे ड्यूटी करतात. नंतर ते गायब होतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन सर्वसामान्यांना याचा त्रास सोसावा लागतो. विशेष म्हणजे या चौकातून पोलिसांचे कवायत मैदान, पोलिसांसाठी हॉल आणि त्यांचे कार्यालय आहे. पोलीस येथून जातात परंतु वाहतुकीची कोंडी त्यांच्या लक्षात का येत नाही? हा एक प्रश्नच आहे. एस पी सुनील कडासने यांनी याकडे लक्ष वेधून कारंजा चौकातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्तव्यदक्ष ट्राफिक पोलीस यांना कर्तव्यावर ठेवावे, अशी मागणी होत आहे.










