चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) चिखली-जालना महामार्गावर बेराळा फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात विनोद तुकाराम कऱ्हाडे (वय ४७, रा. रामानंद नगर, चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रामानंद नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडे हे महामार्गावरून दुचाकीने चिखलीच्या दिशेने येत होते. बेराळा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. मात्र, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि अपघात कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर कऱ्हाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.












Total Users : 3732136