चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) ९ नोव्हेंबर आयुष्याची अनेक वर्षे विविध आस्थापनांमध्ये सेवा दिली, देशाच्या औद्योगिक विकासात वाटा उचलला. आज त्याच निवृत्त कर्मचाऱ्यांसमोर तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरखर्च आणि औषधांचा खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. सोमवारी चिखली नगरपरिषदेत सदिच्छा भेटीसाठी आलेल्या EPS-95 पेन्शनधारक संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही व्यथा मांडली.
महागाई वाढत असताना अत्यल्प पेन्शनवर दैनंदिन खर्चाचा मेळ बसवणे कठीण होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. किमान पेन्शन वाढवा, महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा द्या आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करा, या मागण्या चर्चेत मांडण्यात आल्या. इतर प्रलंबित मागण्यांवरही यावेळी चर्चा झाली. निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी या प्रश्नांची योग्य स्तरावर दखल घेण्याची गरज पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.
कॅप्टन अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या भेटीला जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे संचालक अंकुशराव पाटील, संघटनेचे महासचिव वीरेंद्र सिंग राजावत, बुलढाणा जिल्हा सचिव पी. आर. गवई, सहसचिव कॅप्टन एस. के. राऊत, चिखली तालुकाध्यक्ष डी. आर. साळोख आणि चिखली सचिव पी. व्ही. अधापुरे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते












Total Users : 3732136