spot_img
spot_img

दिवाळीत स्टॉल लागला… आता बाराही महिने बाजार गाजवा! खामगावच्या ‘उमेद’ महोत्सवात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ. नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे यांचे आवाहन

खामगाव (हॅलो बुलढाणा) घरच्या घरी तयार केलेले खाद्यपदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खामगावच्या ग्रामीण महिलांनी दिवाळी महोत्सवात स्टॉल उभारले आहेत. या संधीचा फायदा घेत महिलांनी बाराही महिने दर्जेदार खाद्यपदार्थ आणि वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती कार्यालयासमोर ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान हे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. गटविकास अधिकारी सतीश देशमुख आणि सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महोत्सवाचे उद्घाटन भाजीभाकरे यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शनातील वस्तू ग्रामीण महिलांनी स्वतः तयार केल्या आहेत. नागरिकांनी खरेदीतून त्यांच्या उद्योगाला बळ द्यावे, असे आवाहन तालुका अभियान व्यवस्थापक अनिता सोळंके यांनी केले. यावेळी कविता जुमळे, वर्षा गीते, मीनाक्षी कुवारे, स्वप्निल आराख, निलेश तायडे आणि उमेद ग्रामसखी संघटनेच्या तालुकाध्यक्ष आशा क्षीरसागर उपस्थित होत्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!