spot_img
spot_img

पळसकरांचा आंदोलनाचा इशारा कामी आला… समृद्धीच्या पुलाखाली केबलचं काम सुरू! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कऱ्हाळवाडीतील सौर प्रकल्पाच्या जोडणीला गती. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज कधी मिळणार?

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) २७ एकरांवर सौर प्रकल्प उभा राहिला. पण केबल जोडणी अडली आणि शेतकऱ्यांची दिवसा विजेची प्रतीक्षाही लांबली! अखेर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी आंदोलनाचा इशारा देत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर कऱ्हाळवाडी येथे समृद्धी महामार्गाच्या पुलाखालून केबल टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

डोणगाव परिसरातील शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनी योजनेतून दिवसा वीज मिळावी, यासाठी कऱ्हाळवाडीत सौर प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, पुलाखालून केबल टाकण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने प्रकल्पातून वीजपुरवठा सुरू होण्यास विलंब झाला. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने पळसकरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. केबलचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला होता.

या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला केबल टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुलाखाली प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. केबल टाकून जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पातून वीजपुरवठा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केबलचं काम तर सुरू झालं. आता जोडणी कधी पूर्ण होणार आणि शेतात दिवसा वीज नेमकी कधी येणार, याकडे डोणगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!