spot_img
spot_img

BIG UPDATE! दिवसा ‘अपहरणा’चा गाजावाजा… रात्री नातेवाइकांच्या ताब्यात! अनिरुद्ध शिंगणे प्रकरणात मोठे वळण! चौकशीनंतर पुढील ताब्याची गरज नसल्याचा हमीपत्रात उल्लेख; रात्री ११ वाजता मालेगावात सुखरूप सुपूर्द!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) सराफा व्यापाऱ्याला वाहनात बसवून नेल्यानंतर जिल्हाभर उडालेली पोलिसांची धावपळ… साखरखेर्ड्यात अडवलेली इनोव्हा… अन् तेलंगणा पोलिसांच्या चौकशीचा उलगडा! या नाट्यमय घटनाक्रमात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनिरुद्ध मधुकर शिंगणे यांना चौकशीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचा उल्लेख उपलब्ध हमीपत्र व स्वीकृतीपत्रात आहे.

देऊळगाव मही येथील शिंगणे यांना नविपेट पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २७२/२०२६, बीएनएस कलम ३३१(३), ३०५ संदर्भातील चौकशीसाठी निजामाबाद पोलीस आयुक्तालयाच्या सीसीएस पथकातील पोलीस निरीक्षक चि. अजय यांनी सोबत घेतल्याचे पत्रात नमूद आहे.

चौकशी व पडताळणीनंतर त्यांच्या पुढील ताब्याची आवश्यकता नसल्याने त्यांना नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पत्र सांगते. २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता मालेगाव येथे मामा उद्धव चेके आणि सासरे मनोहर चेके यांनी शिंगणे यांना सुखरूप व चांगल्या प्रकृतीत ताब्यात घेतल्याची नोंद आहे.

तपास अधिकारी, पोलीस किंवा न्यायालयाने बोलावल्यास शिंगणे यांना उपस्थित करण्याची हमी नातेवाइकांनी दिली आहे.

दिवसभर चर्चेचा धुरळा उडवणाऱ्या प्रकरणात आता हमीपत्रातून नवी बाजू पुढे आली आहे. मात्र, संबंधित गुन्ह्यातील शिंगणे यांची नेमकी भूमिका अथवा चौकशीचा सविस्तर निष्कर्ष या पत्रात स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपशीलांसाठी संबंधित पोलिसांच्या अधिकृत माहितीकडे लक्ष लागले आहे.यावेळी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती समाधान शिंगणे, शिक्षक उद्धव चेके किशोर शिंगणे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!