बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कारागृहातील आरोपीने उपचारादरम्यान रुग्णालयातून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विष्णू भगवान तायडे (वय ६०, रा. चिखली) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तायडे बुलढाणा कारागृहात होता. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना चकमा देत त्याने पलायन केले.
आरोपी रुग्णालयातून निसटलाच कसा? त्याच्या देखरेखीची व्यवस्था काय होती? या घटनेत सुरक्षेतील कोणती त्रुटी कारणीभूत ठरली? असे सवाल उपस्थित होत आहेत. पलायनाचा नेमका घटनाक्रम आणि जबाबदारी स्पष्ट होण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.




Total Users : 3674740