spot_img
spot_img

वडिलांनीच मुलाच्या सोयाबीनच्या सुड्यांना लावली आग; 3 लाखांचे नुकसान

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) “तू मला न सांगता सोयाबीन विकलेस” या रागातून वडिलांनीच मुलाच्या शेतातील सोयाबीनच्या सुड्यांना आग लावल्याची धक्कादायक घटना एकलारा शिवार, ता. चिखली येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी अप. नं. 922/26 कलम 326(f) BNS अन्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रानुसार,
फिर्यादी गणेश उद्धव अंभोरे (वय 38, व्यवसाय शेती, रा. एकलारा, चिखली) हे घरी असताना त्यांचे मित्र गजानन आंबोरे यांचा फोन आला. “तुझ्या शेतात तुझ्या वडिलांनी सोयाबीनच्या सुड्यांना आग लावली आहे,” असे त्यांनी सांगितले.
काही वेळातच फिर्यादीचे वडील उद्धव पांडुरंग अंभोरे (रा. एकलारा) शेतातून घरी परत आले आणि म्हणाले, “तू मला न सांगता सोयाबीन विकलेस. माझ्यासोबत घरात वाद घालतोस,” असे म्हणत रागाच्या भरात आपणच आग लावल्याचे कबूल केले. या आगीत शेतातील सोयाबीनच्या सुड्या (कडबा) जळून खाक झाल्या असून फिर्यादीचे अंदाजे 3,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी मुलानेच वडिलांविरुद्ध फिर्याद दिली असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!