spot_img
spot_img

BIG UPDATE! मतपेटी उघडली, पहिल्या फेरीचं चित्र ठरलं! सरनाईक आघाडीवर; देशपांडे दुसरे, देवकर तिसरे… पोहरे चौथ्या, लहाने पाचव्या स्थानी!

अमरावती (हॅलो बुलढाणा) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीचे आकडे समोर आले असून, किरण सरनाईक यांनी ३,९०३ मते मिळवत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावरील डॉ. श्रीकांत देशपांडे यांना २,२०९ मते मिळाली. त्यामुळे सरनाईकांनी १,६९४ मतांची आघाडी घेत सुरुवातीलाच आपली ताकद दाखवली आहे.

सुरेश देवकर १,५८२ मतांसह तिसऱ्या, अदिती पोहरे १,३१९ मतांसह चौथ्या, तर दत्तात्रय लहाने १,१६९ मतांसह पाचव्या स्थानी आहेत. दिलीप कडू यांना ८५७ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत सरनाईकांनी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवली असली, तरी पुढील मतमोजणीत हे अंतर टिकते की चुरस वाढते, याकडे आता लक्ष राहणार आहे.

या फेरीत मोजलेल्या १४ हजार मतपत्रिकांपैकी १३,७०५ मते वैध, तर २९५ मते अवैध ठरली. एकाच जागेसाठी सुरू असलेल्या या लढतीत पहिल्या फेरीने उमेदवारांची सुरुवातीची क्रमवारी स्पष्ट केली आहे.

मात्र, ही पहिल्या फेरीतील स्थिती असून अंतिम निकाल अद्याप बाकी आहे. सरनाईक आघाडी वाढवणार की प्रतिस्पर्धी अंतर कमी करणार? पुढील फेऱ्यांकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!