spot_img
spot_img

बँडचा दणदणाट, आतषबाजीचा झगमगाट… रायपूरमध्ये वाल्मिकी जयंतीचा थाट! वाल्मिकी ऋषींसह लव-कुशांच्या वेशभूषेने वेधले लक्ष; युवा मित्र मंडळाची सलग दुसऱ्या वर्षी भव्य मिरवणूक!

रायपूर (हॅलो बुलढाणा/ सचिन जयस्वाल) बँडच्या सुरांनी धरलेला ठेका… फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेला परिसर… अन् पारंपरिक वेशभूषेने मिरवणुकीला आलेली रंगत! रायपूरमध्ये महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीचा उत्साह दिमाखात झळकला. महर्षी वाल्मिकी ऋषी युवा मित्र मंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने रायपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

मिरवणुकीत दत्तात्रय दांडगे यांनी महर्षी वाल्मिकी ऋषींची वेशभूषा साकारली. लव-कुशांच्या वेशातील गौरी सोनुने आणि लक्ष्मी सोनुने विशेष आकर्षण ठरल्या. या तिघांच्या लक्षवेधी वेशभूषेने सोहळ्याला वेगळीच शोभा आणली. आकर्षक सजावट आणि बँडच्या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साह संचारला.

मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांसह महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. भक्तिभाव आणि जल्लोषाचा संगम अनुभवण्यासाठी जमलेल्या उपस्थितांचे लक्ष पारंपरिक वेशभूषेतील सादरीकरणाकडे खिळले होते. बँडच्या सुरेल सुरांनी आणि आतषबाजीच्या झगमगाटाने उत्सवाची रंगत आणखी वाढवली. मंडळाच्या दुसऱ्या वर्षाच्या आयोजनातही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

दरम्यान, मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावी यासाठी रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकाचौकांत चोख बंदोबस्त ठेवला. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!