spot_img
spot_img

बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई, 2 कोटींच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात कोलकात्यातून 2 आरोपी जेरबंद, 45.77 लाख गोठवले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव येथील सिनियर सिटीझनला डिजिटल अरेस्ट करून 2 कोटी रुपयांनी फसवल्या प्रकरणी सायबर पो.स्टे. बुलढाणा येथे गुन्हा क्र. 28/2026 दाखल आहे.

या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी दि. 14/10/2026 रोजी नारायणगाव-पुणे येथून आरोपी महेश कांबळे यास 25 लाख रक्कम त्याच्या खात्यात गेल्याने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून दि. 19/10/2026 रोजी कोलकाता येथे एअरपोर्ट रोडवरील हॉटेल रॉयल रेसीडेन्सी येथे सापळा रचून बिक्रम बिजय सरकार आणि आफताब आलम अली अकबर (दोघे रा. कोलकाता)* यांना रंगेहाथ पकडले. ते सायबर गुन्ह्यासाठी बँक खाते ऑपरेट करत होते.

या कारवाईत NCCRP पोर्टलवर 44 लाख रुपये आणि आरोपींच्या खात्यातील रक्कम व 37 हजाराचे मोबाईल असा एकूण 45 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल गोठवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या पथकाने – ASI शकील खान, HC राजदीप वानखडे, विक्की खरात, राजू आडवे, PC कैलास ठोंबरे, क्षितीज तायडे, शुभम बोराडे, पुरुषोत्तम साळवे, ऋषीकेश खंडारे यांनी ही कारवाई केली.

आरोपींना खामगाव कोर्टात हजर करून दि. 26/10/2026 पर्यंत पीसीआर मिळाला आहे. सेंट्रल कमांड कोलकाता येथे असल्याचे चिन्ह आहेत.

डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड, शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाने फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 किंवा NCCRP पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!