spot_img
spot_img

CRIME NEWS! गेला होता जेवणासाठी… अन् गळ्यावर झाला चाकूचा वार! मलकापुरातील दुर्गानगरात नेमकं घडलं काय? तरुणाला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या तरुणाला लाथ मारून खाली पाडले अन् गळ्यावर चाकूने वार केला! दुर्गानगर परिसरात २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. योगेश लोटू ढगे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, ढगे दुर्गानगरातील एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे रुपेश शंकर पाटील याने कोणतेही कारण नसताना त्यांना लाथ मारून खाली पाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर धमकी देत त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात ढगे यांच्या गळ्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

चाकूहल्ल्यासोबत लाथाबुक्क्यांचाही मारा!

गजानन किसन पाटील, किसन नारायण पाटील आणि दीपक उर्फ प्रेम संजय पाटील यांनी ढगे यांना पकडून ठेवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचाही आरोप आहे. जेवणाच्या कार्यक्रमात तरुणाला खाली पाडण्यापासून गळ्यावर वार करण्यापर्यंतचा गंभीर घटनाक्रम फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

चौघांविरुद्ध पोलिसांची कारवाई

रुपेश शंकर पाटील, गजानन किसन पाटील, किसन नारायण पाटील आणि दीपक उर्फ प्रेम संजय पाटील हे चौघेही दुर्गानगर, मलकापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!