spot_img
spot_img

शिक्षक निवडणूक::खरी लढत दोन्ही शिवसेनेतच?….बुलढाणा जिल्हा ठरणार किंगमेकर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक मते या वेळेला आहेत. दहा हजार मते असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात तब्बल नहु उमेदवार उभे आहे, तर त्या पाठोपाठ नऊ हजारावर मते असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात दोनच प्रबळ उमेदवार रिंगणात असून स्थानिक अस्मिता नेतृत्वाच्या मुद्दाने जोर धरला आहे. अमरावती जिल्ह्यात उभे असलेले भरभक्कम उमेदवार पाहता मत विभाजन अटळ असून बुलढाणा जिल्हा मात्र किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहे.

या निवडणुकीत अनेक उमेदवार उभे असले तरी मुख्य तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहे. त्यात दोन्ही शिवसेना आपसात लढतील व पाठोपाठ काँग्रेस या तिरंगी लढतीमुळे बुलढाणा जिल्हा निर्णायक ठरू शकतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक दत्तात्रय लहाने, शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक, तर काँग्रेसच्या आदिती पोहरे अशी मुख्य लढत दिसत आहे.

शिक्षकांना बोचतो पैठणीचा डाग
मागील निवडणुकीत येवल्याची प्रसिद्ध असणारी पैठणी सरनाईकांच्या नावावर केव्हा झाली हे मतदारांनाही कळले नाही. यावरून टीकेचे लक्ष झालेल्या शिक्षकांना यंदा पैठणीचा डाग बोचतो आहे.तो पुसण्याची संधी त्यांना उपलब्ध आहे. जवळपास त्याच मानसिकतेमध्ये मोठी टीका सहन करणारे शिक्षक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सरनाईक यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर आहे. ही निवडणूक सरनाईक यांना सोपी नाही. त्यांचे कार्यकर्तृत्व तसेही मागील पंचवार्षिक मध्ये दिसून आले आहे. शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न आजही तसेच रेंगाळत आहे. टप्पा अनुदान व जुनी पेन्शन हे मुद्दे तर आजही धगधगत आहे.

सरंजामी आदेश शिक्षक पाळतील का?
दुसरा काँग्रेस चा उमेदवार ऐनवेळी माथी मारावा असाच दिला गेला.अंतर्गत गटबाजी व खेकडे प्रवृत्तीने ग्रासलेल्या काँग्रेसने ऐन वेळेवर दिलेला उमेदवार कितपत स्वीकारला जातो हा कळीचा मुद्दा आहे. सामाजिक कार्यात शून्य योगदान असणाऱ्या अदिती पोहरे यांचा जनसंपर्क तसाही असून नसल्यागतच आहे. केवळ वडिल हर्षवर्धन देशमुख यांची पुण्याई यावर नशीब आजमावणे त्यांना अवघड डोंगर सर करण्यासारखे आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असले तरी शिवाजी मध्ये भरती होण्यासाठी शिक्षकांना काय काय दिव्य करावे लागते याचा अनुभव शिक्षकांच्या पाठीशी आहे. केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही शिक्षक होता येत नाही, इतरही निकष आहे. बरेच काही करावे लागते,ती गुणवत्ता असेल तरच “शिवाजीत” जमते. त्यामुळे सरंजामी आदेश कितपत पाळले जातात हा प्रश्न आहे. ज्यांची सून म्हणून आदिती पोहरे निवडणुकीत उतरल्या आहे ते प्रकाश पोहरे यांचे वेळोवेळी शिक्षकांविषयी आलेले मत देखील दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. शिक्षकच नव्हे तर एकूणच नोकरदार वर्गाविषयी त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. अगदी पगारावर सुद्धा पोहरे यांनी लिहिले आहे. ही बाब शिक्षक विसरले असतील असे मानण्याचे कारण नाही. केवळ शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आहे म्हणून मतदार शिक्षक पोहरे यांना स्वीकारतील असे मानणे भाबडे पनाचे ठरेल. त्यामुळेच नवख्या आदिती पोहरे यांच्यासाठी ही निवडणूक अवघड सांगितली जाते.

या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत बुलढाण्याचे दत्तात्रय लहाने मात्र सेफ दिसतात.बुलढाणा जिल्ह्यातील बक्कळ मतदान त्यातही त्यांचे तळागाळातील सामाजिक कार्य, विधवा परिषदेच्या माध्यमातून तन-मन धनाने झोकुन देण्याची त्यांची वृत्ती, शैक्षणिक क्षेत्रामध्ये लहाने हे नाव आदराने घेतले जाणे ,त्यामुळे बुलडाणा जिल्हा त्यांच्या नावावर एकवटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरू शकते.

शिक्षकांच्या मनातील बोलताहेत उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी फारसे आढेवेढे न घेता कुठलाही अभ्यास आयोग न नेमता सरसगट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. यावरून त्यांच्या सरळ स्वभावाची कल्पना सर्वांनाच आली आहे. याच वेळी ठाकरे यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचे स्वतः मान्य केले होते. मात्र सरकार पडले आणि तो मुद्दाही बाजूला राहिला. मात्र हा मुद्दा ठाकरे यांनी अजूनही सोडलेला नाही. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी याच विषयावर जाहीर पत्रक प्रसारित केले असून जुनी पेन्शन योजना व टप्पा अनुदानावर मोठे भाष्य केले आहे. कोरोना काळात जेव्हा कर्मचारी पगार कपातीचा मुद्दा आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांचे पगार शाबूत ठेवले होते हे विशेष.त्यामुळे ठाकरे यांच्याविषयी गुरुजी सॉफ्ट आहे.आता प्रा.लहाने यांच्यासाठी ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे. जुनी पेन्शन लागू करण्याचे अभिवाचन त्यानि दिले असून लहाने यांच्यासाठी ही जमेची बाब ठरू शकते. नेमके याच मुद्द्यावर पदवीधर निवडणुकीमध्ये नवखा
उमेदवार विजयी झाला होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!