spot_img
spot_img

BIG BREAKING! येळगाव धरणाच्या पाण्यावरून बुलढाण्यात मोठा ट्विस्ट! एका पत्राने १७ ग्रामपंचायतींसमोर उभा राहिला नवा पेच; शहराची तहान भागणार, पण गावांच्या घागरी भरणार कुठून? धरणातील पाणी उपसा बंद करण्याच्या सूचनांमुळे आता पुढे काय घडणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा न्यूज नेटवर्क) दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात आता पाण्यावरून मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत! येळगाव धरणातील घटत्या जलसाठ्यामुळे बुलढाणा नगरपरिषदेने तब्बल १७ ग्रामपंचायतींना धरणातून पाणी उपसा बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे बुलढाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवताना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घशाला कोरड पडणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे!

अपुऱ्या पावसामुळे येळगाव धरणातील पाणीसाठा घटला असून घटत आहे भविष्यात शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. धरणातील पाणीसाठा बुलढाणा शहरातील वाढती लोकसंख्या बघून राखीव असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
पांगरी,साखळी बुद्रुक,नांद्राकोळी, खुपगाव,बिरसिंगपूर,डोंगरखंडाळा,हतेडी,सव, अजिसपूर,कोलवड,दत्तपूर-अफजलपूर वाडी, देऊळघाट,उमाळा,केळवद,शिरपूर,जयसिंगपूर, केसापूर आणि अंत्रीतेली या गावांच्या ग्रामपंचायतींना पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.
नगरपरिषदेने पूर्वीच्या करारनाम्यातील अटींचा आधार घेत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य दिले आहे.शहराची तहान भागवताना गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडणार का? पर्यायी जलस्रोत तातडीने उपलब्ध झाले नाहीत, तर हजारो ग्रामस्थांनी पाण्यासाठी जायचे कुठे? प्रशासनाकडे याचे उत्तर आहे का?
येळगाव धरणाच्या पाण्यावरून आता शहर विरुद्ध गाव असा संघर्ष उभा राहणार की प्रशासन दोघांचीही तहान भागवणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!