spot_img
spot_img

BIG STATEMENT! आज कोट्यवधींची माया जमवाल, पण उद्या तुमच्या लेकरांना श्वास घ्यायलाच हवा नसेल तर…? चिखलीत मुख्यमंत्री फडणवीसांचे खासगी सचिव विद्याधर महालेंचा काळजाला भिडणारा सवाल! रामानंद EV मोटर्सच्या उद्घाटनातून दिला भविष्यातील मोठ्या संकटाचा इशारा; भारताच्या ऊर्जा क्रांतीचे गुपितही उलगडले!

चिखली (हॅलो बुलढाणा) पुढच्या पिढीसाठी कोट्यवधींची संपत्ती जमवून काय उपयोग, जर त्यांना श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवाच उरली नाही तर? विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणाऱ्यांना विचार करायला लावणारा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी चिखलीत दिला!

चिखली येथील रामानंद ईव्ही मोटर्सच्या उद्घाटनप्रसंगी महाले यांनी पर्यावरण संवर्धन, ऊर्जा स्वावलंबन आणि शेतकरी समृद्धीचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.

‘भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर केवळ रस्ते आणि इमारती उभारून चालणार नाही; स्वच्छ हवा, सुरक्षित पर्यावरण आणि समृद्ध शेतकरी घडवावा लागेल,’ असा संदेश त्यांनी दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देश स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे महाले म्हणाले.

सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज, सिंचनासाठी मदत आणि शेतीखर्चात बचत होऊ शकते. तर ऊसापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल-डिझेलच्या आयातीवर परकीय चलन खर्च करण्यापेक्षा देशातच ऊर्जेचे पर्याय उभे करा! इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार हा भारताच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इथेनॉलबाबत गैरसमज पसरवण्याऐवजी नागरिकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रामानंद ईव्ही मोटर्ससारखे उपक्रम पर्यावरणपूरक वाहतुकीच्या क्रांतीला बळ देणारे असल्याचे सांगत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराचे स्वागत केले.‘इतिहास आपल्याला किती पैसा कमावला म्हणून नव्हे, तर पुढच्या पिढीसाठी कसा भारत ठेवला म्हणून लक्षात ठेवेल!’ या विचारातून महाले यांनी प्रत्येक नागरिकाला पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!