spot_img
spot_img

BIG POLITICAL! अमरावती शिक्षक मतदारसंघात देवकर सरांचा ‘विजयी एल्गार’! २६ उमेदवारांच्या रणधुमाळीत सुरेश देवकर इतिहास घडवणार? बुलढाण्यात कपिल पाटलांची सिंहगर्जना; शिक्षकांच्या हक्कांसाठी आता आरपारची लढाई!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे! तब्बल २६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर सर यांनी संघटनात्मक ताकदीच्या जोरावर निवडणुकीत जोरदार आव्हान उभे केले आहे! शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या देवकर सरांच्या प्रचारार्थ बुलढाण्यात झालेल्या सभेत शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी थेट इतिहास घडवण्याचा विश्वास व्यक्त केला!

रविवार, १८ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिरच्या सभागृहात देवकर यांच्या प्रचारार्थ उत्साहात सभा पार पडली. यावेळी शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘अमरावती शिक्षक मतदारसंघ हा सुरुवातीपासून परिवर्तनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या सुरेश देवकर यांच्या नेतृत्वात शिक्षक मतदारसंघाची अस्मिता कायम राहिली आहे. आता देवकर यांच्या रूपाने अमरावती विभागात नवा इतिहास घडणार!’असा ठाम विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सुरेश देवकर सरांनी स्पष्ट भूमिका मांडली. जुनी पेन्शन योजना, शाळांच्या अनुदानाचे प्रलंबित प्रश्न आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याची ग्वाही त्यांनी दिली.केवळ निवडणूक जिंकणे नव्हे, तर शिक्षकांचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्याचे आव्हान देवकर यांच्यासमोर आहे

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!