मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी… आकर्षक सप्तशृंगी गडाचा देखावा… आणि अचानक कानठळ्या बसवणारा गोंधळ! मलकापूर शहरातील रामवाडी परिसरात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास असा काही थरार घडला की संपूर्ण परिसर हादरून गेला! गौरीशंकर नवदुर्गा मंडळाचा भव्य ‘सप्तशृंगी गड’ देखावा अचानक कोसळल्याने आठ जण जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
नवरात्रोत्सवानिमित्त मलकापूर शहरात विविध नवदुर्गा मंडळांनी आकर्षक देखावे उभारले आहेत. रामवाडीतील सप्तशृंगी गडाचा देखावा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. महिला आणि नागरिकांची येथे मोठी गर्दी होत होती. मात्र शुक्रवारी रात्री अचानक देखावा कोसळला आणि उत्सवाच्या आनंदावर भीतीचे सावट पसरले!
क्षणात आरडाओरडा, जखमींना रुग्णालयात हलवले!
या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून, एका जखमीला पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले. इतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोहम माछरे आणि पोलिस निरीक्षक गणेश गिरी घटनास्थळी दाखल झाले






Total Users : 3622787