spot_img
spot_img

दुष्काळाची चाहूल… पण लोणारकरांच्या घशाला कोरड पडू देणार नाही! भूषण मापारींचा निर्धार; बोरखेडी धरणावर नगर परिषदेची धडक! अवैध मोटारपंपांवर मुख्याधिकारी बोबडेंचा कारवाईचा इशारा; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब होणार!

लोणार (हॅलो बुलढाणा / राहुल सरदार) दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच लोणारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासन आतापासूनच ॲक्शन मोडवर आले आहे! ‘संकट कितीही मोठे असले तरी लोणारकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ असा निर्धार माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) बोरखेडी धरणावर नगर परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. धरणातील जलसाठा, पंप हाऊस, जलशुद्धीकरण यंत्रणा आणि मुख्य पाइपलाइनची तपासणी करून संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले.

विशेष म्हणजे, धरणावरील अवैध मोटारपंपांचा मुद्दाही ऐरणीवर आला! मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी असे मोटारपंप बंद करण्याचे स्पष्ट निर्देश पाणीपुरवठा अभियंत्यांना दिले.

या पाहणीत उपनगराध्यक्ष आबेद खान पठाण, गटनेते नितीन शिंदे, पाणीपुरवठा सभापती अरुण जावळे, सभापती संतोष मापारी, नगरसेवक पंढरी चाटे, मुख्याधिकारी आशिष बोबडे आणि अभियंता राठोड सहभागी झाले.

आता खरी कसोटी अंमलबजावणीची!

पाणीगळती रोखून नियोजित वेळेत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाआधीच लोणार नगर परिषदेने उचललेल्या पावलांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!