spot_img
spot_img

माऊलीच्या कृपेने आ.संजय कुटे यांच्या पाठपुराव्याला यश! गिरडा येथे ३.८१ हेक्टर जमिनीवर कायमस्वरूपी बांधकामाला मंजुरी! स्मृतीकेंद्र, रुग्णालय, निसर्गोपचार केंद्र उभारणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आ. संजय कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे गिरडा येथील श्री संत गजानन महाराजांच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना गिरडा (ता. बुलढाणा) येथे यात्रास्थळ विकासासाठी ३.८१ हेक्टर शासकीय जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला. या ३.८१ हेक्टर जागेवर संस्थानकडून भाविकांसाठी मोठ्या सुविधा उभारल्या जाणार आहेत:
स्मृतीकेंद्र, इको-टुरिझम सेंटर, शांती कुटीर, निवास संकुल, सभागृह, प्रदर्शन केंद्र, नॅचरोपॅथी केंद्र, आयुर्वेदिक संशोधन केंद्र, रुग्णालय आणि ग्रामीण कुटीर उद्योग येथे होणार आहेत.

▪️जागेचा इतिहास काय?

यापूर्वी वृक्षलागवडीसाठी संस्थानला गिरडा येथे एकूण १९.०६ हेक्टर (१९ हेक्टर ६ आर) जमीन देण्यात आली होती. त्यापैकी आता ३.८१ हेक्टरवर बांधकामाला विशेष मंजुरी दिली आहे. उर्वरित १५.२५ हेक्टर जमिनीवर फक्त वृक्षलागवडच करावी लागणार आहे, अशी अट आहे.या निर्णयासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४० आणि शासन निर्णयातील अटींना विशेष सूट देण्यात आली आहे. गिरडा हे बुलढाणा-अजिंठा महामार्गावर वसलेले निसर्गरम्य गाव असून संत स्वयंप्रकाश महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या निर्णयामुळे गिरडा हे एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!