मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची प्रतीक्षा करत दिव्यांग बांधवांची फरफट सुरू असताना त्यांच्या वेदनांची दखल घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी दाखवलेली तत्परता चर्चेचा विषय ठरली आहे!
मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी बोर्डावर तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर राहिल्याने अनेक दिव्यांगांना ताटकळावे लागले. अपंग जनता दलाचे राज्य सचिव कलीम शेख यांनी तक्रार करताच डॉ. बिराजदार यांनी केवळ फोनवर आदेश देण्याऐवजी सायंकाळी साडेपाच वाजता स्वतः रुग्णालयात धडक दिली!
वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंबरकर यांना जाब विचारत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. दिव्यांगांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही दिला.यावेळी गजानन ठोसर, हनुमान जगताप आणि अनिलकुमार गोठी यांनी डॉक्टरांच्या अनुपस्थितीसह खासगी दवाखान्यांमुळे शासकीय सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप मांडले






Total Users : 3620940