spot_img
spot_img

EXCLUSIVE! बुलढाण्यात उभं राहणार दुसरं ‘वनतारा’? अनंत अंबानींचा हिरवा कंदील! मेनका गांधींचा पुढाकार अन् खामगावच्या सुनीता आयलानींची थेट जामनगरात धडक!जमीन खरेदी करा, सहकार्य आम्ही करू! अनंत अंबानींचा सकारात्मक प्रतिसाद; आता ‘भाईजीं’च्या मदतीने बुलढाण्यात प्राण्यांसाठी साकारणार नवा आश्रय?

खामगाव (हॅलो बुलढाणा विशेष) बुलढाणा जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांसाठी आनंदाची बातमी! खामगावच्या प्राणीप्रेमी सुनीता आयलानी यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ‘वनतारा’च्या धर्तीवर प्राणी मदत केंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे!

३ ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या सूचनेनुसार सुनीता आयलानी यांनी थेट जामनगर गाठून उद्योगपती अनंत अंबानी यांची भेट घेतली. खामगाव तालुक्यात जखमी, आजारी आणि निराधार प्राण्यांसाठी मदत केंद्र उभारण्याची विनंती त्यांनी केली.

विशेष म्हणजे, ‘तुम्ही जागा खरेदी करा, आम्ही सहकार्य करू,’ असा सकारात्मक प्रतिसाद अनंत अंबानी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे!

यानंतर मेनका गांधी यांनी ‘भाईजीं’शी संपर्क साधून आयलानी यांना जमीन मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली.भाईजींनीही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.सर्व प्राणीप्रेमींनी या उपक्रमासाठी सुनीता आयलानी यांना सहकार्य करावे, असे आवाहन भाईजींनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!