spot_img
spot_img

धाडच्या रिजवान सौदागरांच्या लेआउटमध्ये रात्री काय घडलं? सकाळी ठेकेदार आले अन्…!

धाड (हॅलो बुलढाणा) रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली… सायंकाळी काम आटोपून कामगार निघून गेले… मात्र सकाळी ठेकेदार पुन्हा कामावर पोहोचले, तेव्हा तेथे ठेवलेले चार लोखंडी चॅनल गायब होते! धाड येथील रिजवान सौदागर यांच्या शेतातील लेआउटमध्ये हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

वालसा वडाळा, ता. भोकरदन, जि. जालना येथील बांधकाम ठेकेदार भाऊसाहेब रामदास सानवणे यांनी सौदागर यांच्या गट क्रमांक ४६६ मधील लेआउटच्या सिमेंट रस्त्याचे काम घेतले आहे. ११ ऑक्टोबर रोजी काम सुरू केल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत काम करून ते निघून गेले. बांधकामाचे साहित्य आणि चार लोखंडी चॅनल कामाच्या ठिकाणीच ठेवले होते.

१२ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास सानवणे कामावर आले असता चॅनल दिसले नाहीत. प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीचे चार चॅनल, असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी धाड पोलिसांत दिली.

तक्रारीनुसार, चोरीचा कालावधी ११ ऑक्टोबरच्या रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊदरम्यानचा आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.काम सुरू होताच साहित्यावर डल्ला मारणारा चोरटा कोण? आता पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!