बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेती, आरोग्य आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न घेऊन सावळा-सुंदरखेड-माळविहीर परिसरातील नागरिक आज प्रशासनाच्या दारात आपल्या मागण्या मांडणार आहेत. प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आज, गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावळा-सुंदरखेड-माळविहीर परिसर कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीने या मोर्चाची हाक दिली आहे. ‘आपली शेती, आपला परिसर, आपले आरोग्य आणि आपले भविष्य’ या मुद्द्यांभोवती नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रस्तावित डेपोबाबत नागरिकांच्या चिंता प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी ठामपणे मांडणे, हा मोर्चाचा उद्देश आहे. परिसराचा विकास आणि नागरिकांचे हित यासंबंधीच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी समितीची भूमिका आहे.
सावळा, सुंदरखेड, माळविहीर, भादोला आणि आसपासच्या गावांतील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व संबंधित नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. आपल्या परिसरासाठी एकत्र उभे राहून प्रशासनापर्यंत आवाज पोहोचविण्याचा निर्धार या आवाहनातून व्यक्त करण्यात आला आहे











Total Users : 3533971