spot_img
spot_img

BREAKING! एक धडक… अन् बिबट्याची अखेरची झेप! चिखलीच्या उदयनगर रोडवर नर बिबट्याचा मृत्यू!

चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) जंगलात दबदबा राखणाऱ्या बिबट्याची झेप रस्त्यावर कायमची थांबली! चिखली तालुक्यातील उदयनगर रोडवर आज दिनांक 30 रोजी रात्री 8 च्या सुमारास टाकारखेड हेलगा ते डसालळा डांबर रोड येथील शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू झाला. अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाच्या या बिबट्याला वाहनाची धडक जीवघेणी ठरली.

वन्यजीवनातील चपळाई आणि ताकदीचे प्रतीक असलेला हा रुबाबदार प्राणी अपघाताचा बळी ठरल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षित वावराचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. जंगलातील त्याचा मुक्त वावर या दुर्दैवी घटनेने कायमचा संपला.

उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक वैभव काकडे आणि बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी कार्यवाही केली. यामध्ये रघुनाथ नेवरे, संदीप मडावी, पवन वाघ, अमोल चव्हाण, बुलढाणा रेस्क्यू टीम आणि रेखा पैठणे यांचा सहभाग होता.

ही घटना रस्त्यांवरील वन्यप्राण्यांच्या वावराबाबत सजग राहण्याची गरज अधोरेखित करते. विशेषतः वन्यप्राणी आढळणाऱ्या परिसरात वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे आणि सावधपणे प्रवास करणे, ही खबरदारी अशा जीवघेण्या अपघातांचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!