spot_img
spot_img

‘चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात!’ लाकडांची चिता समोर रचून गजानन बोरकर उपोषणावर; सारंगपूर ग्रामपंचायत प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सारंगपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीवर गंभीर आक्षेप घेत यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हाप्रमुख गजानन माधव बोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या समोर लाकडांचा ढीग रचून ते उपोषणाला बसल्याने या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

बोरकर यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत चौकशी समितीने निष्पक्ष चौकशी केली नसल्याचा आरोप केला आहे. उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंग, सदस्यांची कथित विधाने तसेच उपसरपंचांचा लेखी जबाब याकडे चौकशीदरम्यान दुर्लक्ष झाल्याचा त्यांचा दावा आहे.

बोरकर यांच्या म्हणण्यानुसार, काही ग्रामपंचायत सदस्यांनी व्हिडिओमध्ये संबंधित ठराव आपल्या समोर झाला नसल्याचे सांगितले असून, या पुराव्यांची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पडताळणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी प्रक्रियेदरम्यान तक्रारदार व नागरिकांशी अपमानास्पद भाषेत वर्तन करून दबाव निर्माण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पुरावे समोर असताना चौकशी नेमकी कोणाला वाचवण्यासाठी? असा सवाल उपस्थित करत बोरकर यांनी स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कारवाईची मागणी केली आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!