spot_img
spot_img

EXCLUSIVE मेहकरच्या मुख्य रस्त्यावरून घरी सुखरूप पोहोचू का? डिव्हायडरसाठी थेट गडकरींकडे धाव; निवेदनावर ‘इम्पॉर्टंट’ शेरा!

मेहकर (हॅलो बुलढाणा) शहराच्या मुख्य रस्त्यावरून पायी चालताना किंवा दुचाकीवर जाताना घरी सुरक्षित पोहोचू की नाही, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अपघातांना आळा घालण्यासाठी डिव्हायडर उभारण्याची मागणी आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

डिव्हायडर संघर्ष समितीच्या वतीने आज गडकरी यांना निवेदन देण्यात आले. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समितीने त्यांच्यासमोर मांडला. या मागणीची दखल घेत गडकरी यांनी निवेदनावर ‘इम्पॉर्टंट विषय’ असा शेरा नोंदवला आणि तात्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले.

निवेदनावरील शेरामुळे मेहकरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र रस्त्यावर डिव्हायडर प्रत्यक्ष उभा राहेपर्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. आणखी एखादा अपघात होण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणांनी या मागणीवर जलद निर्णय घ्यावा, अशी मेहकरवासीयांची अपेक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!