बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना ‘बापा’वरून केलेले वक्तव्य महागात पडले आहे. विद्याधर महाले यांच्य यांच्या अभूतपूर्व रॅलीत ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर आ.श्वेता महाले यांनी ठेका धरला होता. “बाप तो बाप है लेकिन बापासारखा शरीर आणणार कुठून..? ” असे विधान आ.संजय गायकवाड यांनी आ. श्वेता महाले यांना उद्देशून
केल्याने एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलीस ठाण्यात आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात चिखली मतदार संघाच्या भाजपा आ.श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने बुलढाणा शहरात मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला होता. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत “बाप तो बाप रहेगा….” अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते. या गाण्यावर प्रसारमाध्यमांनी आ.संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता आ.संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना जीभ घसरली होती.
“बाप तो बाप है हे ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठून….? ” असा प्रश्न उपस्थित केला होता. हे विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवरून डिवचण्यात आले असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतूपुरस्कर केल्याची तक्रार करत एका महिलेने आ.संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्री आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













Total Users : 3448961