देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) येथील जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम उपविभागात अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याने बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस येण्याची शंका काही जाणकारांनी उपस्थित केली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधण्याची मागणी केली जात आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवल्या प्रकरणी महाराष्ट्रात कठोर कारवाई सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही असे प्रकार असून अशा प्रकरणांची निक्षून चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे.देऊळगाव राजा येथे जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी या पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याने दोन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाण्यातून काढले व व्हेरिफिकेशन सुद्धा करून घेतले आहे. तसेच अनेक ठिकाणी या प्रमाणपत्राचा वापर करून लेखनिक सुद्धा घेतला आहे.
नोकरी लागल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालय अकोला येथे आपली पडताळणी तीन लाख रुपये देऊन केल्याचे बोलल्या जात आहे. सदर बोगस महिला दिव्यांगाने कानाचे 45 टक्के भेटलेले परमनंट बोगस सर्टिफिकेट हे डोळ्याच्या सर्टिफिकेटवर नोकरी लागल्यावर सरेंडर केल्याचे म्हटल्या जाते.
परमनंट 45 टक्के भेटलेल्या कानाचे दिव्यांग सर्टिफिकेट हे अचानक कोणते उपचार करून कान ठीक केले? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. तिने डोळ्याचे व कानाचे असे दोन बोगस सर्टिफिकेट मिळवले होते, याची चर्चा होत आहे.दरम्यान यासंदर्भात जिल्हा परिषद सीईओ कडे अनेकदा तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याची ओरड कायम आहे.












Total Users : 3416580