बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सहकार क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याची पताका थेट आशिया खंडासह सातसमुद्र पार फडकविणाऱ्या बुलढाणा अर्बनचे अभ्यासू अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर आणि शिक्षण क्षेत्रात आपली दणकेबाज ओळख निर्माण करणारी सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा कोमलताई झंवर यांनी ‘हॅलो बुलढाणा’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.या खास मान्यवरांच्या आगमनाने कार्यालयात उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.सहकारमहर्षी विकास पुरुष तथा बुलढाणा जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय राधेश्यामजी चांडक अर्थात (भाईजी) यांच्या खांद्याला खांदा लावून बुलढाणा अर्बनचे जाळे गावखेड्यापासून देश-विदेशापर्यंत मजबूत करण्यात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले डॉ.सुकेश झंवर यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे.सहकार,अर्थकारण, सामाजिक प्रश्न आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत असलेला त्यांचा दांडगा अभ्यास या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत प्रकर्षाने जाणवला.
जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर डॉ.झंवर यांनी मांडलेले विचार दूरदृष्टीपूर्ण आणि दिशादर्शक ठरले. प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांचे ज्ञान,अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन सर्वांनसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.भाईजींच्या लाडक्या कन्या कोमलताई झंवर यांनीही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नावाप्रमाणेच कोमल स्वभाव, साधेपणा, विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता आणि शैक्षणिक विकासाची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
या भेटीदरम्यान ‘हॅलो बुलढाणा’चे सर्वेसर्वा जितू कायस्थ,कायस्थ रेस्टॉरंटचे संचालक सोमू कायस्थ, बुलढाणा अर्बनचे अधिकारी मोरेश्वर जोशी व त्यांच्या पत्नी, तसेच टीम हॅलो बुलढाणाचे सदस्य उपस्थित होते.यावेळी ‘हॅलो बुलढाणा’ परिवाराच्या वतीने डॉ.सुकेश झंवर आणि कोमलताई झंवर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. ही भेट केवळ सदिच्छा भेट न ठरता सहकार, शिक्षण आणि जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यावर झालेला अभ्यासपूर्ण संवाद ठरली!











Total Users : 3403852