spot_img
spot_img

प्रशांत आंबी शिवीगाळ प्रकरण पेटणार? आ.संजय गायकवाड विरुद्ध आरती आंबी करणार विनयभंगाची तक्रार दाखल?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरकारला जाब विचारला म्हणून पुण्यातील संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक होते.मात्र आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री फोनवर महिलेला लाजेची हानी होईल,अशी अश्लिल शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांना अटक होत नाही,गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? असे म्हणत प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी आमदार संजय गायकवाड विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये हा मोठा वाद निर्माण झाला होता. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व बदनामी केल्याचा दावा त्यांनी केला होता. आक्षेपावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना रात्री फोन करून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती.याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.मात्र आमदार संजय गायकवाड यांच्यावर साधा एफआयआर दाखल झाला नाही मात्र सरकारला जाब विचारला म्हणून पुण्यातील संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल होऊन मध्यरात्री त्यांना अटक झाली. त्यामुळे सर्व सामान्यांसाठी वेगळा आणि श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल प्रशांत आंबी यांच्या पत्नी आरती आंबी यांनी उपस्थित केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कोथरूड पोलीस स्टेशनला जाऊन आ. गायकवाड यांच्याविरुद्ध विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे गुन्हे दाखल करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!