जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) एसडिओ काळे साहेब! चाळीस टपरी येथील गर्भवती मृत्यू प्रकरणी काही पत्रकारांनी चुकीचे वार्तांकन केल्याचे सांगत, सकारात्मक पत्रकारितेचा उपदेश देऊन प्रशासनाची पाठ थोपाटत आहात. तडफडत असलेल्या दोन जीवांना कुठलीही प्रशासकीय मदत मिळाली नाही. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही प्रशासनाची बेफिकिरीआहे.प्रशासनात काही चांगले अधिकारी आहे, शासन चांगले कामही करते परंतु ‘काही प्रशासकीय अधिकारी माती खातात’ असा प्रखर शब्द प्रहार भाऊ भोजने यांनी केला.येथे एका न्यूज चॅनल च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एसडीओ काळे अध्यक्ष म्हणून भाषण करीत होते. या भाषणावर भाऊ भोजने यांनी शाब्दिक पालटवार केला आहे. याची व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच एका न्यूज चॅनल चा 13 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. संजय कुटे गैरहजर असल्याने एसडीओ काळे यांना अध्यक्षीय भाषणाची मुभा भेटली. खरे तर लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून मिडियाला मान्यता असतांना ह्या चौथ्यास्तंभाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी करावा,हा आयोजकांचा करंटेपणा असून, मिडीयाची अधोगती ती दुसरी कोणती?असा भोजने यांनी प्रश्न केला. शासनाच्या चाकरमान्याला पत्रकारितेवर बोलण्याची मुभा भेटली म्हणून एसडीओ काळे यांनी चाळीस टपरी येथील गर्भवती महिलेच्या सर्पदंश मृत्यू प्रकरणावर प्रशासनाच्या बाजूने भाष्य केले.ही घटना काही पत्रकारांनी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे विशद केले. गर्भवती महिला रस्त्याने जळगाव जामोद पर्यंत रुग्णालयात चालत आली. मी स्वतः संबंधितांशी फोनवर मदतीसाठी बोललो म्हणाले.मात्र पावसाळी दिवसात चाळीस टपरी गावातून पहाडी एकेरी पायवाटेने चालताही येत नाही.तेव्हा तडफडणारा जीव हा रस्ता कसा पार करणार? तिला चादरेची झोळी करून नेण्यात आले.तिला प्रशासनाची कुठलीच मदत मिळाली नाही. रुग्णवाहिका सुविधा मिळाली नव्हती. रुग्णालयात सर्पदशांची लस उपलब्ध नव्हती.त्यामुळे दोन जीव वाचू शकले नाही. अन् तुम्ही दुर्दैवी घटना म्हणून हात झटकता कां? असाही प्रश्न भाऊ भोजने यांनी उपस्थित केला.
गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत षंढ प्रशासन आहे. हे का नाकबूल करावे?त्याबद्दल थोडीही दिलगीरी नाही तर नाही लाज लज्जा पण नाही.आपल्या संवेदना बोथट कशा झाल्या? गोमालमध्ये मागे झालेल्या प्रकरणावरून कोणाताही धडा प्रशासनाने घेतला नाही. आणि आपण सत्य बातमी प्रकाशित करणाऱ्यांवरच बोट ठेवत आहात. शासनापासून घटना दाबण्याचा प्रयत्न होते, हे दुःखद आहे.
शासनाचं चांगलच काम आहे. पण प्रशासकिय अधिकारी माती खातात अन् आपण पाझीटीव्ह बातम्यांची अपेक्षा पत्रकारांकडून करता?असे प्रश्न भोजने यांनी फेसबुक पोस्टवर मांडले आहेत.













Total Users : 3392883