बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ॲड. निलेश कुमार सवडदकर यांच्या प्रभावी युक्तीवादामुळे विनयभंग करून आक्षेपार्ह फोटो व चित्रफित इंस्टाग्राम व सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपातून जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाची निर्दोष मुक्तता केली आहे.
चिखली परिसरातील एका महिलेला आरोपी अरुण संभाजी घेवंदे यांनी ‘माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे अश्लील व्हिडिओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेल अशी धमकी देत विनयभंग करून अपेक्षार्ह चित्रफित व फोटो इन्स्टाग्राम वरती व्हायरल केल्याचा आरोप होता.याप्रकरणी पोलीस स्टेशन चिखली येथे बी. एन. एस. ७४,७५,७८ व इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याचे कलम ६६ प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता. सदर प्रकरण हे विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय ३ रे बुलढाणा यांचे न्यायालयात चालले. प्रकरणा मध्ये आरोपी यांचे विधिज्ञ यांनी कौशल्यपूर्ण घेतलेले पुरावे व त्यांचा प्रभावी युक्तिवाद यांचे अवलोकन करून विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपींची १ सप्टेंबर २०२६ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी यांचे वतीने ॲड. निलेशकुमार पी. सवडदकर यांनी काम पहिले. त्यांना ॲड. सागर पंजवानी, ॲड. वैष्णवी जैस्वाल,ॲड. प्रियांका श्रीवास्तव व अविनाश हिवाळे व सागर सवडदकर यांनी सहकार्य केले.













Total Users : 3383950