spot_img
spot_img

दारू पिऊन स्टेअरिंग हाती घेतलं अन् वाहतूक शाखेच्या जाळ्यात अडकलं!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध जिल्हा वाहतूक शाखेने चिखली शहरात धडक कारवाई केली. अचानक राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान संबंधित वाहनचालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप अवसरमोल, भारत सानप, निलेश शिंगणे, संदीप मोरे आणि संतोष चिडे यांनी ही कारवाई केली. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!