spot_img
spot_img

Exclusive : ACBच्या ‘उघड चौकशी’त नाव… तरीही मंडळ अधिकारी थेट नायब तहसीलदार! विजय टेकाळेंची पदोन्नती नेमकी कुणाच्या ‘आशीर्वादा’ने? फाईलमधला महत्त्वाचा मुद्दा कुणी केला गायब? पडद्यामागे किती कोटींची ‘डील’… आता ‘हॅलो बुलढाणा’ उघडणार एक-एक कडी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तत्कालीन मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या कथित बेहिशेबी संपत्तीच्या आरोपांची चर्चा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची उघड चौकशी सुरू असतानाच त्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती कशी मिळाली, हा आता गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नेमकं कुणाचं संरक्षण मिळालं? पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवताना ACB चौकशीची माहिती लपवण्यात आली का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

टेकाळे यांच्याविरोधात गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांतून गंभीर आरोप प्रसिद्ध झाले होते. कथित बेहिशेबी मालमत्ता, महसूल व्यवहारांतील भागीदारी आणि वरिष्ठांशी आर्थिक संगनमताचे आरोपही करण्यात आले. मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांनी विजय दत्तात्रय टेकाळे, तत्कालीन मंडळ अधिकारी, यांच्याविरुद्ध EO/04/Buldhana/2024 अन्वये उघड चौकशी सुरू असल्याचे पत्रव्यवहारातून स्पष्ट केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. पोलीस उपअधीक्षक भोगाजी चोरमले यांच्या पत्रानंतर या प्रकरणाला पुन्हा धार आली आहे.

सर्वात मोठा प्रश्न असा उठतो की, उघड चौकशी प्रलंबित असल्याची माहिती असतानाही पदोन्नतीचा प्रस्ताव पुढे कसा गेला? संबंधित नोंदीतून महत्त्वाचा मुद्दा वगळण्यात आला का? आणि असे झाले असेल तर त्यासाठी जबाबदार कोण?

या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि पदोन्नती प्रक्रियेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ‘हॅलो बुलढाणा’ या प्रकरणाचा पाठपुरावा निडर आणि निर्भीडपणे सुरूच ठेवणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!