spot_img
spot_img

गडी गेला हैदराबादी बिर्याणी खायला… अर्ध्या तासाने बाहेर आला अन् शेगावच्या श्री टॉकीज चौकात उडाला ‘लाल-काळा’ धक्का!

शेगाव (हॅलो बुलढाणा) शेतीसाठी खत आणायला शेगावात आलेल्या शेतकऱ्याला बिर्याणीची तल्लफ चांगलीच महागात पडल्याची घटना श्री टॉकीज चौक परिसरात घडली. गडी हैदराबादी बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेला आणि अवघ्या अर्ध्या तासात बाहेर येताच त्याची दुचाकी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.

लोहारा, ता. बाळापूर येथील प्रताप नारायण वावरे हे १२ जुलै रोजी शेतीसाठी खत खरेदी करण्यासाठी शेगावात आले होते. त्यांच्याकडे भाऊ महादेव नारायण वावरे यांच्या नावावरील लाल-काळ्या रंगाची एच.एफ. डीलक्स दुचाकी क्रमांक एमएच-३० बीजी-६०६७ होती.

सायंकाळी सुमारे चार वाजता त्यांनी श्री टॉकीज चौकातील हैदराबादी बिर्याणी हॉटेलसमोर दुचाकी उभी केली आणि बिर्याणी खाण्यासाठी आत गेले. साडेचारच्या सुमारास बाहेर आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला.

आजूबाजूला चौकशी आणि शोधाशोध करूनही गाडीचा पत्ता लागला नाही. अंदाजे २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांत दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघमारे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!