spot_img
spot_img

कोरोना काळात जीव धोक्यात… आता भत्त्यासाठी उपोषणाची वेळ! कोऱ्हाळा बाजारात अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्सचा संताप

मोताळा (हॅलो बुलढाणा/ विश्वास वाघ) तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर्स यांना अद्याप कोरोना भत्ता मिळालेला नाही. या अन्यायाविरोधात संबंधित महिलांनी 1 जुलै 2026 पासून दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली.

कोरोना काळात गावोगावी फिरून आरोग्य सर्वेक्षण, जनजागृती, औषधोपचाराची माहिती, रुग्णांची नोंद आणि प्रशासनाला मदत अशी धोकादायक जबाबदारी या महिलांनी पार पाडली. मात्र संकट काळात पुढे केलेल्या या हातांना आज हक्काच्या भत्त्यासाठी रस्त्यावर बसावे लागत आहे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. हक्काचा कोरोना भत्ता तातडीने मिळाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!