spot_img
spot_img

खेर्डा येथील ‘संत पूजन सोहळा’ व ‘गजानन निष्ठांची मांदियाळी’ उत्साहात संपन्न.. हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत पूजन, सत्कार व महाप्रसादाने सांगता; गजानन भक्तांचा उलटला जनसागर!

ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर)वर्षात सकाळ मंगळी,ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भू मंडळी भेटत होता, माऊलींच्या या ओवी प्रमाणे जळगाव जामोद ते वरवट बकाल रस्त्यावरील खेर्डा येथील श्री संत गजानन महाराज पाणपोई संस्थान येथे पवित्र पुरुषोत्तम (अधिक) मास पर्वकाळा निमित्त संस्थानचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख यांच्या संकल्पनेतून व प्रसिद्ध कीर्तनकार हभप एकनाथ महाराज पाचमासे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तीन दिवसीय ‘संत पूजन सोहळा’ व ‘गजानन निष्ठांची मांदियाळी’चा सोहळा गेल्या २८ मे रोजी भक्तिमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. संत पूजन व परिसरातील सर्व गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तांचा सत्कार व महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.दि. २६ मे मंगळवार रोजी दशमीला सकाळी तीर्थस्थापना व “श्रीं”च्या पादुकांचा महाअभिषेकाने सोहळ्यास प्रारंभ झाला. सायंकाळी हरिपाठ व देवीचा गोंधळ झाला,२७ मे बुधवारला सौ विद्याताई वानखडे पुणे यांच्या सुमधुर वाणीतून एकादशीला सामूहिक पारायण व वारकरी भजनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

२८ मे गुरुवारला द्वादशी व प्रदोष पर्वकाळाच्या दिवशी मुख्य सोहळा पार पडला. सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री.ह.भ.प. भागवताचार्य गोपाल महाराज गारमोळे, लासूरा(मलकापूर) यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन झाले. कीर्तन श्रवणासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ‘संत पूजन तसेच परिसरातील सर्व गजानन महाराज संस्थानचे व इतर संस्थानचे विश्वस्त यांचा सत्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा व अकोला जळगाव खा. जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील संताचा सन्मान करण्यात आला यामध्ये ह भ प गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचे प्रवर्तक आचार्य हरिभाऊजी वेरूळकार गुरुजी नांदुरा, चांगेफळ येथील स्वामी रामभारतीजी महाराज, हभप सारंगधर महाराज मेहुणकर,गुरुवर्य वासुदेवानंद सरस्वती,हभप बाबुराव महाराज येसोने,हभप वासुदेव महाराज सोने,गुरूवर्य आप्पा स्वामी महाराज दत्तवाडी,हभप बापूसाहेब देशमुख महाराज हिवरखेड,गोपाल महाराज पारोळा महादेव,गुरुवर्य महामंडलेश्वर बाबा बादलखोरे,हभप सारंगधर महाराज गोळेगावकर,हभप रामराव महाराज मेहुणकर, हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ वारी भैरवगड,ह भ प माऊली शांताराम महाराज एकलारा, ह भ प वासुदेवनंद सरस्वती महाराज निमगाव, ह भ प अवलिया संत गाठोडे महाराज घुसरवाडी, अवलिया संत संकेत महाराज चोहट्टा बाजार, स्वामी चैतन्य महाराज, महालक्ष्मी माता कारंजा,हभप गोपाळ महाराज उरळकर,हभप वासुदेव महाराज महल्ले,गुरुवर्य अंबादास मानकर,हभपअशोक महाराज जायले,हभप रामभाऊ महाराज झांबरे,हभप निलेश महाराज भुंबरे,हभप भिकाजी महाराज मिरगे,हभप गुरूवर्य गणेश महाराज हिरोळकर शंकरगिरी महाराज संस्थान पळशी झाशी,गुरूवर्य उदयसिंग महाराज पाचोरा,अवलिया संत संजय बाबा टाकळी,हभप श्रीकांत काळे,शैलेश दादा पाटील गणेश शेगाव, भक्तिमती वंदुबाई माऊली, भक्तिमती लीलाताई पळसोदकर,सुनील बालपांडे नागपूर, श्री गजानन महाराज संस्थानच्या विविध शाखांचे विश्वस्त व इतर संस्थांनचे विश्वस्त कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर आले. “आपण सर्व श्रींचे भक्त एकमेकांचे सहकारी आहोत” हा भाव यावेळी अधोरेखित झाला. सर्व मान्यवर संतांचे पूजन करून सत्कार करण्यात आला.
दुपारी १२ नंतर सुरू झालेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. स्वयंशिस्त व शांततेत सुरू असलेल्या महाप्रसाद व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले. ‘गजानन निष्ठांची मांदियाळी’ या नावाप्रमाणेच सर्व भक्तांनी एकत्र येऊन सहभोजन केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संत पूजन सोहळा सेवा समिती,श्री संत गजानन महाराज पाणपोई संस्थान, खेर्डा येथील सर्व पदाधिकारी, महिला सेवाधारी, पुरुष सेवाधारी युवक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने व सर्व संतांच्या आशीर्वादाने हा पुरुषोत्तम मास महोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.प्रास्ताविकातून हभप एकनाथ महाराज पाचमासे यांनी या सोहळ्याची संकल्पना मांडली. दरम्यान या वेळी माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अर्पणताई कुटे यांनी सोहळ्याला भेट दिली.या वेळी संस्थानाचे वतीने त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त शिक्षक ढोले गुरूजी यांनी तर आभार गजानन महाराज पाणपोई संस्थानाचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले. पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!