बुलडाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील वाढत्या तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडला असताना, पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांसाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेटने एक दिलासादायक पाऊल उचलले आहे. काँग्रेस नेते संदीपदादा शेळके आणि संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर इंधन रांगेतील नागरिकांसाठी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल व डिझेल मिळवण्यासाठी तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर रात्रभर रांगेत थांबण्याची वेळ येत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत तहान भागवणारा हा उपक्रम ‘मानवतेचा आधार’ ठरत आहे.
धामणगाव बढे, शेंबा, मोताळा, उदयनगर, आंबेटाकळी, नांदुरा, पातूर्डा, संग्रामपूर, जळगाव, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, मेहकर, देऊळगाव साकरशा, जानेफळ, सुलतानपूर, बिबी, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा अशा अनेक भागांतील पेट्रोल पंपांवर शुक्रवारी थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. पुढील काळात जिल्ह्यातील सर्व प्रमुख पंपांवर हा उपक्रम सातत्याने राबवला जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
उन्हाच्या तडाख्यात शेतकरी वर्गाला शेतीची कामेही थांबवता येत नाहीत, आणि इंधनासाठी रांग सोडणेही शक्य नाही. त्यामुळे पाणी, अन्न आणि विश्रांतीशिवाय ताटकळत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अशा वेळी थंड पाण्याचा घोट मिळाल्यावर चेहऱ्यावर उमटणारा दिलासा अनेकांनी शब्दांत व्यक्त केला.












Total Users : 3546324